जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित संस्थेवर ईडीचे छापे   

नवी दिल्ली/बंगळुरू : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंधित असणार्‍या ओपन सोसायटी फाउंडेशन (ओएसएफ) आणि त्याच्याशी संबंधित काही संस्थांची परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन केल्याबाबत चौकशीसाठी छापे टाकले. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली.फेमा अंतर्गत, ओएसएफ आणि काही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांच्या परिसराची झडती घेण्यात आली आहे. हे प्रकरण ओएसएफद्वारे थेट परकीय गुंतवणुकीची (एफडीआय) कथित पावती आणि फेमा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून काही लाभार्थ्यांनी या निधीचा वापर केला आहे. ईडीच्या कारवाईबाबत ओएसएफकडून कोणतीही अजून प्रतिक्रिया आलेली नाही.
 
हंगेरियन-अमेरिकन राजकीय कार्यकर्ते सोरोस आणि त्यांची संघटना ओएसएफ यांच्यावर सत्ताधारी भाजपकडून देश हिताच्या विरोधात काम केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अदानी-हिंडेनबर्ग वादाच्या वेळी त्यांच्या विधानांवरही पक्षाकडून टीका करण्यात आली होती. ओएसएफने १९९९ मध्ये देशात काम सुरू केले.
 

Related Articles